सोयाबीन

सोयाबीनवरील कवडी करपा

Colletotrichum truncatum

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • बेढब तपकिरी डाग शेंगांवर आणि खोडावर दिसतात.
  • शीरा तपकिरी होतात.
  • पाने मुडपतात.
  • संक्रमित कोवळी रोपे मरतात.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

अँथ्रॅकनोज बहुधा लक्षणे न दर्शविता सोयाबीनच्या खोडाला, शेंगांना आणि पानांना संक्रमित करु शकते. बियाणे रुजायच्या वेळेसच लक्षणे दिसतात. जेव्हा हवामान उबदार आणि आर्द्र असते तेव्हा छोटे गडद बेढब डाग खोडावर आणि शेंगांवर दिसतात. हे डाग छोटया काळ्या ठिपक्यांनी भरतात. पाने मुडपतात आणि शिरा तपकिरी होतात. जास्त संक्रमित शेंगांतील दाणे छोटे आणि वांझ असतात. जर अंकुरलेल्या रोपावर संक्रमण लवकर झाले तर ती मरतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

अँथ्रॅकनोजविरुद्ध आतापर्यंत तरी कोणतेही जैव उपचार उपलब्ध नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर ५%पेक्षा जास्त दाणे संक्रमित असतील तर बुरशीनाशकाच्या उपचारांची शिफारस करण्यात येते. क्लोरोथॅलोनिल, मँकोझेब, कॉपर किंवा प्रोपिकोनॅझोलचे फवारे आणि आंतर्प्रवाही बुरशीनाशक थियोफेनेट मिथाइलचा वापर केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

जंतु रोपाच्या अवशेषात एका वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. संक्रमित अवशेषात तयार झालेले बीजाणू वार्‍याने आणि पावसाने वरच्या पानांवर पोचतात. पाने ओली असताना, पाऊस किंवा दव प्रति दिवशी १२ तास किंवा जास्त असणे ह्या काळात विशेषकरुन संक्रमण होते. एकुण ह्या रोगामुळे पीकाच्या उत्पन्नावर जास्त परिणाम होत नाही पण रोपे आणि बियांची प्रत कमी भरते. अनुकूल हवामान असणार्‍या भागात (ओल्या जमिनी, उबदार आणि आर्द्र हवामान), पीकाचे चांगलेच नुकसान होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • उच्च प्रतीची प्रमाणित बियाणे लावा.
  • दुकानदाराला सहनशील वाण आहेत का विचारा.दोन ओळींमधील अंतर ५० सें.मी.पेक्षा कमी ठेऊ नका.
  • रोपांचे नियमित निरीक्षण करा आणि वापरानंतर हत्यारे आणि अवजारे साफ ठेवा.
  • दाणे सभोवतालच्या तापमानात साठवा.
  • रोपांचे अवशेष खोल नांगरुन गाडुन टाका किंवा जाळुन टाका.
  • यजमान नसलेल्या पीकाबरोबर पीक फेरपालट केल्यास बुरशीचे जंतु साचु शकत नाहीत.

प्लँटिक्स डाऊनलोड करा