इतर

तृण धान्यांवरील डोळ्यांसारखे ठिपके

Oculimacula yallundae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • गडद तपकिरी ते हिरवट तपकिरी, लंब वर्तुळाकार, डोळ्यांसारखे दिसणारे ठिपके खोड आणि खालील पर्णकोषावर दिसतात.
  • डाग एकत्रित वाढुन खोडाला वेढतात ज्यामुळे पाणी आणि पोषणांचे वहन कमी होते.
  • जसा रोग वाढतो, तो खोड कमकुवत करतो आणि झाड आडवी होण्याची शक्यता वाढवितो.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

इतर

लक्षणे

रोपावस्थेत संक्रमण झाल्यास रोपांची मर होते. गोल, डोळ्यांच्या आकाराचे डाग खोडाच्या बुडाजवळ येतात. त्यांची केंद्रे पिवळसर असतात आणि कडा हिरवट ते गडद वर्तुळांच्या असतात. बहुतेक वेळा जमिनीजवळच्या पर्णकोषांवर डोळ्यांसारखे डाग उमटतात. हे डाग एकत्रित वाढुन खोडाला वेढतात ज्यामुळे त्यांचा नेहमीचा विशिष्ट गोल आकार जातो. पाणी आणि पोषकांचे वहन कमी होते आणि यामुळे फुले पांढरी पडून वाळत असल्याने उत्पादनात मोठी घट होते. जसा रोग वाढतो, तो खोड कमकुवत करतो आणि झाड आडवी होण्याची शक्यता वाढवितो. मुळे या रोगामुळे प्रभावित होत नाहीत आणि वर वर्णन केलेली कोणतीही लक्षणे दर्शवीत नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

ऑक्युलिमॅक्युला यालुंडेविरुद्ध कोणतेही सेंद्रिय उपचार उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बहुतेक बुरशीनाशके स्वास्थ्यासाठी किंवा पर्यावरणासाठी हानीकारकच असतात आणि म्हणुनच त्यांच्या वापराची सहजासहजी शिफारस केली जात नाही. बोस्कॅलिड आणि ट्रायाझोल प्रोथियोकोनाझोलवर आधारीत बुरशीनाशके चांगलीच परिणामकारक असतात. सिप्रोडिनिलसुद्धा परिणामकारक आहे पण इतर तृणधान्यावरील रोगात सीमित परिणाम देते.

कशामुळे झाले

ऑक्युलिमॅक्युला यालुंडे नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. फार काळापर्यंत (२ वर्षे किंवा जास्त) राहिलेल्या पीकांच्या जमिनीतील अवशेषात ही जिवंत राहू शकते. प्राथमिक संक्रमण वसंत ऋतुत जेव्हा हवामान अनुकूल असते तेव्हा बीजाणू वार्‍याने किंवा पावसाने अवशेषातुन रोपांवर पडतात. फक्त खोडाच्या भागात बुरशी संक्रमण करते. शरद आणि वसंत ऋतुतील मध्यम तापमान, ओले हवामान (दव, धुक) आणि वारंवार पडणारा पाऊस बुरशीच्या जीवनचक्रास आणि संक्रमण प्रक्रियेस पूरक असतो. एकदा का बुरशी खोडात शिरली, की मग उच्च तापमानात रोगाची वाढ चांगलीच फोफावते. राय आणि ओट सारख्या इतर तृणधान्यांसह पीक फेरपालट केल्यामुळे त्याचा प्रसार वाढतो आणि संक्रमण होण्याची शक्यता वाढते.


प्रतिबंधक उपाय

  • स्थिर आणि प्रतिकारक वाण लावा.
  • लागवड करताना बियाण्यांना खोल पेरु नका.
  • खूप लवकर पेरणी करणे टाळा.
  • प्राथमिक संक्रमण टाळण्यासाठी नांगरताना सुव्यवस्थित सरी करा.
  • यजमान नसलेल्या पीकांसोबत पीक फेरपालट योजना आखा.
  • पीक घेतल्यानंतर पीकाचे धसकट शेतातुन काढुन नष्ट करा.
  • लागवड करताना जास्त अंतर ठेवल्यास झाडी चांगली येते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा