इतर

गव्हाच्या पान आणि कुसांवरील डाग (करपा)

Parastagonospora nodorum

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • खालच्या पानांवर बारीक पाणी शोषल्यासारखे पिवळे ठिपके येतात व कालांतराने पिवळ्या कडांसकट अंडाकृत फिकट तपकिरी डाग तयार होतात.
  • संक्रमित पानांवर बारीक तपकिरी बीजाणू फळे वाढलेल्या राखाडी डागात दिसतात.
  • गडद तपकिरी ते गडद जांभळे डाग कुसांवर येतात.
  • उगवलेल्या रोपांच्या कोंबांचे टोक तपकिरी असतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

इतर

लक्षणे

खालच्या पानांवर बारीक पाणी शोषल्यासारखे पिवळे ठिपके येतात. हा रोग खालच्या पानांपासून ओंबीपर्यंत पोहोचतो. कालांतराने हे ठिपके तपकिरी, अंडाकृती किंवा ओबडधोबड आकाराच्या पिवळ्या कडा असलेल्या धब्यांमध्ये रुपांतरीत होतात. जसजसा रोग वाढत जातो तसे वाढलेल्या राखाडी डागातील बीजाणू भिंगाच्या सहाय्याने किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने पाहता येतात. गंभीर संक्रमित पान टोकाकडून मध्याकडे वाळत येतात व पानांवर करपट भाग विकसित होतात. फुलधारणेनंतर ओल्या हवामानात कुसांवर देखील ठिपके येऊ शकतात. लक्षणे नेहमी टोकापासुन सुरु होऊन कालांतराने पूर्ण भाग राखाडी मध्य असणारे करपट भागात रुपांतरीत होतात. गंभीर संक्रमणामुळे दाणे वजनाने हलके आणि आक्रसलेले असतात. संक्रमित बियाणे अनियमित उगवतात आणि त्या रोपांचे कोंब तपकिरी टोकाचे असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

फेओस्फेरिया नोडोरमविरुद्ध कोणतेही सेंद्रिय उपचार उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही खात्रीलायक उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

रसायनिक उपचारांनी या बुरशीची साथ कमी करता येते पण लहान शेतात ती व्यवहार्य नाही. जर बुरशीनाशकांची गरज पडलीच तर डिफेनोकोनॅझोल, ट्रायाडिमेनॉल किंवा फ्ल्युक्विकोनॅझोल असणारे उत्पाद वापरले जाऊ शकतात. वापराची पद्धत संक्रमणाचा काळ आणि लागवडीचा प्रकार यावर अवलंबुन आहे.

कशामुळे झाले

पॅरास्टागोनोस्पोरा नोडोरम नावाच्या बुरशीमुळे हा रोग उद्भवतो जी गव्हाच्या तणीस, संक्रमित बियाण्यात किंवा पर्यायी यजमानाच्या झाडात जगते. या बुरशीचे वहन पाण्याने होते आणि संक्रमणासाठी तिला पाने १२ ते १८ तास ओली असणे गरजेचे आहे. जमिनीलगतच्या जुन्या पानांवर पहिल्यांदा हल्ला होतो व त्या नंतर बुरशी वार्‍याने किंवा पावसाच्या थेंबांनी झाडाच्या वरच्या भागात आणि शेजारच्या शेतात पसरते. मोसमात उशीरा झालेले संक्रमण जर वरील कॅनोपीत पसरत असेल तर कुसांवरही डाग येतात ज्यामुळे दाणे आक्रसलेले असतात आणि पीकाचे उत्पादन कमी होते. बीजाणू लांब अंतरापर्यंत वार्‍याने पसरतात आणि हंगामात नंतर इतर शेतातील झाडांवर संक्रमण करतात. यामुळे पुढील पिके प्रभावित होतात आणि अनियमितपाने उगवतात. तापमान ७ डिग्री सेल्शियस किंवा त्या पेक्षा कमी झाल्यास बुरशीचे जीवनचक्र ठप्प होते. २० आणि २७ डिग्री सेल्शियसच्या तापमानात ती फोफावते.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले किंवा प्रमाणित स्रोतांकडील जंतुविरहित बियाणे वापरा.
  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास सहनशील किंवा लांब कांड्याचे वाण लावा.
  • उशीरा तयार होणारी गव्हाची जात लावा किंवा मोसमात उशीरा पेरणी करा.
  • लागवडीचे अंतर योग्य ठेवा.
  • संतुलित खत नियोजन करा व संप्रेरके कमी वापरा.
  • निरोगी झाडांसाठी जमिनीतील पालाशची पातळी पुरेशी आहे याची खात्री करा.
  • रोगाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • तणनाशकचा वापर कमी ठेवा.
  • यजमान नसणार्‍या पीकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • खोल नांगरुन झाडांचे अवशेष गाडुन टाका.
  • शेतातील तनीस व दसकट काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा