बाजरी

बाजरीवरील तांबेरा

Puccinia substriata

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर पिवळे ते पांढरे ठिपके येतात व कालांतराने पिवळी कडा असलेले लालसर नारिंगी "तांबेर्‍याच्या" फोडांत रुपांतरीत होतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बाजरी

लक्षणे

पानांच्या दोन्ही बाजूंनी बारीक पिवळे ते पांढरे ठिपके येतात. हे ठिपके थोडे उंचवट्यासारखे असु शकतात. जसजसा रोग वाढत जातो, तसतसे हे ठिपके एकमेकांत मिसळतात आणि लालसर नारिंगी आणि तांबेर्‍याचे फोड तयार होतात. ह्या फोडांना पिवळी कडा असु शकते. नंतर हे फोड गडद होतात. पाने संसर्गामुळे सुकु शकतात आणि जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडे कोलमडतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

पुसिनिया सबस्ट्रियाटावर कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

कॉपर मिश्रणे, क्लोरोथॅलोनिल, गंधक किंवा मँकोझेब सारख्या बुरशीनाशकांना बाजरीवरील तांबेर्‍याचे नियंत्रण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. छोट्या शेतकर्‍यांना बरेचदा बुरशीनाशके आर्थिक दृष्टीने व्यवहार्य नसतात.

कशामुळे झाले

ह्या बुरशीचे बऱ्याच प्रकारचे पर्यायी यजमान जसे कि वांगी आणि बऱ्याचशा गवताच्या जाती आहेत. बुरशी वार्‍याद्वारे लांबवर पसरु शकते. पुढे ही बुरशी जमिनीत, रोपांच्या अवशेषांवर आणि पर्यायी यजमानांवर जिवंत राहु शकते. ह्या बुरशीच्या वाढीसाठी थंड रात्र आणि गरम दिवस ज्यात पानांवर दव पडते हे खूप अनुकूल असते. ह्या वातावरणात संसर्गाची जोखीम जास्त असते.


प्रतिबंधक उपाय

  • रोग प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • लवकर पेरणी करा.
  • तुषार सिंचन पद्धतीचे पाणी देणे टाळा.
  • बाजरीचा ज्वारी व शेंगवर्गीय पिकांसोबत पीक फेरपालट करा.
  • बाजरीच्या पिकाजवळ वांगी लावु नका.
  • गवत वर्गीय तणांचे निर्मूलन करा.
  • शेतात स्वच्छता राखा - रोपांचे अवशेष काढा किंवा जाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा