मका

टारफुला

Puccinia sorghi

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर खूप बारीक उंचवटलेले व गव्हाळ ठिपके उमटतात.
  • हे ठिपके नंतर सोनेरीसर तपकिरी पुटकुळ्यात बदलतात ज्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजुला विखुरलेल्या असतात.
  • लक्षणे शक्यतो झाडाच्या इतर भागात दिसत नाहीत.
  • खोड अशक्त आणि मऊ पडते आणि झाड कोलमडण्यास संवेदनशील होते.

मध्ये देखील मिळू शकते


मका

लक्षणे

पानांच्या दोन्ही बाजुला खूप बारीक उंचवटलेले व गव्हाळ ठिपके उमटतात. हे प्रामुख्याने गोलाकार ठिपके नंतर सोनेरीसर तपकिरी रंगाच्या पावडरी पुटकुळ्यात बदलतात जे पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजुला विखुरलेले असतात. जसे झाड वाढत जाते तसा याचा रंग काळा पडु शकतो. इतर तांबेरा रोगांच्या उलट, लक्षणे झाडाच्या खोड, पर्णकोष किंवा कणसासारख्या इतर भागात दिसत नाहीत. तरीपण खोड अशक्त आणि मऊ पडते ज्यामुळे झाडे कोलमडण्यास संवेदनशील असतात. कोवळ्या पानातील भाग हा बुरशीच्या संक्रमणास जुन्या पानांपेक्षा जास्त संवेदनशील असतो. कोवळ्या रोपात जर लागण झाली तर पानांवर पिवळेपणा दिसु शकतो आणि पाने वाळू शकतात ज्यामुळे जर वरची पाने प्रभावित झाली असली तर पीकाचे चांगलेच नुकसान होऊ शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

प्युसिनिया सोरघीविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. संवेदनशील वाणांवर वापरल्यास बुरशीनाशके फायदेशीर ठरतात. हवामान परिस्थितीमुळे तांबेर्‍याचा प्रसार झपाट्याने होणार असेल तर मोसमात लवकर बुरशीनाशके वापरावीत. तांबेर्‍याच्या नियंत्रणासाठी भरपूर बुरशीनाशके उपलब्ध आहेत. मँकोझेब, पायराक्लोस्ट्रोबिन, पायराक्लोस्ट्रोबिन + मेटाकोनाझोल, पायराक्लोस्ट्रोबिन + फ्लुक्सापायरोक्सॅड, अॅझोक्सिस्ट्रोबिन + प्रोपिकोनाझोल, ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन + प्रोपिकोनाझोल असणारे उत्पाद या रोगाच्या नियंत्रणासाठी वापरले जाऊ शकतात. उपचारांचे उदा.: पुटकुळ्या दिसु लागताच मँकोझेब २.५ ग्रॅ./ली.छी फवारणी करावी आणि फुलधारणेपर्यंत दर १० दिवसांच्या अंतराने करीत रहावे.

कशामुळे झाले

प्युसिनिया सोरघी नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. बुरशी जमिनीत विश्रांती घेते आणि वसंत ऋतुमध्ये बीजाणू सोडते. वारा आणि पावसाने बीजाणूंचे वहन लांब अंतरापर्यंत होऊ शकते. पानांवर पडल्यापडल्या ते संक्रमण सुरु करतात. एका झाडावरुन दुसर्‍या झाडावरील दुय्यम प्रसारही वार्‍याने आणि पावसाने होतो. उच्च सापेक्ष आर्द्रता (जवळपास १०० %), दव, पाऊस आणि १५ ते २० डिग्री सेल्शियसचे थंड तापमान (भागाप्रमाणे बदलु शकते) हे बुरशीला अनुकूल आहे. उष्ण, कोरडी हवा या बुरशीच्या विकासाला आणि घटनेला आळा घालते. बिजोत्पादन आणि स्वीट कॉर्नसाठी वापरण्यात येणाऱ्या झाडांमध्ये ही समस्या जास्त जाणवते. गुरांना चारा म्हणुन लावलेल्या पीकात, औद्योगिक उत्पाद किंवा प्रक्रिया उद्योगात वापरल्या जाणार्‍या पिकात जास्त गणना होत नाही. झाडांची उत्पादनक्षमता कमी झाल्याने आणि रोपे कोलमडल्याने उत्पादन कमी येते.


प्रतिबंधक उपाय

  • स्थानिकरीत्या उपलब्ध असलेले प्रतिकारक वाण लावा.
  • संक्रमणासाठी अनुकूल परिस्थिती टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
  • कमी कालावधीत तयार होणारे वाण लावा.
  • संतुलित खते देण्याची खात्री करा.
  • यजमान नसलेल्या पीकांबरोबर पीक फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा