आंबा

आंबा आणि पपईवरील अँथ्रॅकनोज करपा

Colletotrichum gloeosporioides

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • फळांवर मोठे गडद तपकिरी डाग येतात.
  • ह्या डागांमध्ये गुलाबीसर ते नारिंगी ठिपके वाढतात.
  • पानांवर गडद कडांचे आणि पिवळ्या प्रभावळीचे राखाडी ते तपकिरी डाग येतात.

मध्ये देखील मिळू शकते


आंबा

लक्षणे

अँथ्रॅकनोज पानांवर आणि देठांवरही दिसते पण जास्तकरुन हा फळांचा रोग आहे. पानांवर प्रादुर्भावाचे लक्षण राखाडी ते तपकिरी डाग असून त्यांची कडा गडद पिवळी असते. कालांतराने हे डाग मोठे होऊन एकमेकांत मिसळतात ज्याने मोठे करपलेले भाग तयार होतात. सुरुवातीला फळांच्या सालींवर लहान, फिकट रंगाचे ठिपके दिसतात. जशी ती पिकतात तसे डाग चांगलेच मोठ्या गोल आकाराचे (५ सें.मी. पर्यंत) होतात आणि गोल, गडद तपकिरी रंगाचे, पाणी शोषल्यासारखे किंवा उंचवट्यासारखे दिसतात. ह्या डागांमध्ये केंद्रीत गुलाबीसर ते नारिंगी खूप दाट ठिपके दिसतात. लहान लालसर तपकिरी खोलगट डाग (२ सें.मी. पर्यंत) ज्यांना "चॉकलेट डाग" असेही म्हटले जाते तेही दिसतात. फ़ळे अकाली गळतात. खासकरून जेव्हा फळांना वातानुकुलीत परिस्थितीत साठवण केलेली असतात अशा वेळी सुद्धा फळांवर ह्या रोगाची लक्षणे येऊ शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

बॅसिलस सबटिलिस किंवा बॅसिलस मिलोलिकफॅसियन्सवर आधारीत बुरशीनाशकेही जर अनुकूल हवामानात वापरली तर चांगला परिणाम देतात. बियाणांवर किंवा फळांवर गरम पाण्याचे उपचार (४८ डिग्री सेल्शियस गरम पाण्यात २० मिनीटे बुडवुन ठेवणे) केल्यानेही जर काही बुरशीचे अवशेष राहिले असतील तर मारले जातील आणि रोगाचा प्रसार शेतात किंवा परिवहनात होणार नाही. जेव्हा संक्रमित काटक्या काढीत असाल तेव्हा छाटलेल्या जागी बोर्डो पेस्ट (सीयुएसओ४:चुना:पाणी हे १:२:६) लावावी. १०-१२ दिवसांच्या अंतराने लागोपाठ किमान ३ वेळा फवारणी करावी.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अॅझॉक्सिस्ट्रोबिन, क्लोरोथॅलोनिल किंवा कॉपर सल्फेट असणार्‍या बुरशीनाशकांची लागोपाठ ३ वेळा १०-१२ दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास संसर्गाची जोखीम कमी होते. ह्या बुरशीनाशाकांचा वापर बीज प्रक्रियेमध्ये सुद्धा करता येऊ शकतो. अखेरीस, परदेशातील बाजारपेठेमध्ये पाठवल्या जाणाऱ्या फळांवर खाद्य श्रेणीतील मेणांसह बुरशीनाशकाचा एकत्र वापर केल्यास ह्या रोगाची लागण कमी करता येऊ शकते.

कशामुळे झाले

जगभरात अँथ्रॅकनोज हा महत्वाचा रोग आहे. कोलेटोट्रिकम ग्लोइयोस्पोरीऑइडस नावाच्या जमिनीत रहाणार्‍या बुरशीमुळे हा रोग उद्भवतो. ही बुरशी कोयींमध्ये किंवा जमिनीवरील पिकाच्या अवशेषात जिवंत रहाते. अनुकूल हवामानात निरोगी, जखमी न झालेल्या कैर्‍यांवर वार्‍याद्वारे आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्यामुळे पसरते. आंबा, केळी, अॅव्हेकॅडो हे बुरशीचे काही पर्यायी यजमान आहेत. मध्यम तापमान (इष्टतम १८ ते २८ डिग्री सेल्शियस), अतिशय उच्च आर्द्रता (९७% किंवा जास्त) आणि जमिनीचा कमी सामू (५.८ ते ६.५) ह्या रोगाच्या वाढीसाठी अनुकूल असतात. कोरडी हवा, कडक ऊन किंवा अतिशय जास्त तापमान ह्याची वाढ खुंटवितात. ह्या बुरशीला तिचे जीवन चक्र पूर्ण करण्यासाठी लागण झालेली फळे एका विशिष्ट प्रमाणापर्यंत पिकणे गरजेचे असते.


प्रतिबंधक उपाय

  • कमी पावसाच्या ठिकाणी लागवड करा.
  • पाण्याचा निचरा चांगला होईल अशी व्यवस्था करा.
  • रोगाचा अधिक प्रादुर्भाव टाळण्यासाठी लवकर काढणी करा.
  • रोग प्रतिकारक वाण व निरोगी बियाणे वापरा.
  • दोन झाडांमध्ये जास्त अंतर ठेवा.
  • यजमान नसणारी झाडे जसे कि लिंबुवर्गीय पिके किंवा कॉफी बागेच्या आजुबाजुला लावा.
  • हवा चांगली खेळती रहाण्यासाठी झाडांची वार्षिक छाटणी करा.
  • शेतातुन गळलेली पाने, फांद्या आणि फळे काढुन टाका.
  • शेतातुन तण नियंत्रण व्यवस्थित करा आणि पर्यायी यजमान काढुन टाका.
  • फळांना चांगली खेळती हवा असणार्‍या ठिकाणी साठवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा