बाजरी

बाजारीवरील अरगट

Claviceps fusiformis

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • कणसाच्या फुलाच्या गुच्छातुन दुधाळ गुलाबी ते लाल मधासारखा चिकट द्राव स्त्रवतो.
  • काळ्या तंतुंचा थर किंवा बुरशी कणसातील धान्याची जागा घेते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

बाजरी

लक्षणे

कणसाच्या संक्रमित फुलाच्या गुच्छातुन दुधाळ गुलाबी ते लाल मधासारखा चिकट द्राव स्त्रवतो. तो द्राव पानांवर आणि जमिनीवरही पडु शकतो. ह्या द्रावात बुरशीचे बीजाणू मोठ्या प्रमाणात असतात. संक्रमित फुलोरा धान्यात रुपांतरीत होत नाही. धान्याची जागा ह्या काळ्या बुरशीचे थर घेतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

निंबोळीयुक्त उत्पादने वापरली जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

झायरम असणारे बुरशीनाशक वापरुन अरगट बुरशीचे नियंत्रण आणि प्रतिबंध केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

ह्या बुरशीच्या वाढीसाठी सापेक्ष दमट हवामान आणि २० ते ३९ डिग्री सेल्शियसचे तापमान अत्यंत अनुकूल असते. संसर्ग झाल्यानंतर ५ ते ७ दिवसांनी चिकट द्रावाचे स्त्रवन होते. हा मधाळ रस फुलोर्‍यात दुय्यम संसर्गास प्रोत्साहन देतो. चिकटा पडलेले कणीस जर खाल्ले गेले तर मानवास तसेच प्राण्यांनाही गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. बुरशी संपूर्ण वर्षभर रोपांच्या अवशेषांत जिवंत राहु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • रोग प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • निरोगी बियाणे वापरा.
  • संतुलित पोषण (नत्रयुक्त खतांचा वापर कमी करून स्फुरदयुक्त खतांची मात्रा वाढवा) देण्याची खात्री करा.
  • कोरडवाहू परिस्थितीत लवकर लागवड करावी.
  • खोल नांगरणी करून पिकांचे अवशेष गाडुन टाका.
  • ज्वारीमध्ये मुग आंतरपीक घ्यावे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा