मका

लाल कूज

Glomerella tucumanensis

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • विविध आकाराचे लालसर तपकिरी धब्बे खोडावर येतात.
  • खोडाच्या पांढऱ्या भागांच्या आत लाल कुजलेले भाग दिसतात.
  • लाल अंडाकृत ठिपके पानांवर मुख्यतः मध्य शिरेवर येतात.
  • लाल, तपकिरी किंवा राखाडी रंगहीनता आणि खारे गंध स्वरूपात धान्य कुज होते आणि आंबट वास येतो.

मध्ये देखील मिळू शकते


मका

लक्षणे

संक्रमित खोडांमध्ये फिकट रंग आणि पृष्ठभागावर मोठ्या लाल रंगाची धब्बे कमी अधिक प्रमाणात वाणांप्रमाणे दिसतात. खोड उभे कापल्यास लाल कुजलेले भाग नेहमी पांढऱ्या असणार्‍या भागात निदर्शनात येतात. प्रतिकारक झाडांमध्ये लाल, रोगग्रस्त भाग बर्‍याचदा पेऱ्यांपर्यंतच मर्यादित असतात. जसे रोग वाढतो तसतशी खोडाच्या आत पोकळी तयार होते आणि कठोर तंतुंचे गठ्ठे देखील दिसतात.पाने आक्रसतात आणि वाळतात. संक्रमित झाडातून घाण वास येतो व प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत खोड सहजपणे तुटते. बारीक लाल अंडाकृती किंवा लांबट डाग मध्य शिरावर किंवा काहीवेळा मध्यशिरेच्या समांतर तयार होतात. पानाच्या देठावर लाल रंगाचे धब्बे आणि लहान गडद ठिपके काहीवेळा पानाच्या पात्यावर विकसित होतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

गरम पाण्याचे उपचार (उदाहरणार्थ २ तासांसाठी ५० अंश सेल्शियस) बियाण्यावरील रोग जंतुंना मारण्यासाठी आणि लाल कुजीच्या घटना नियंत्रित करण्यासाठी वापरली जाऊ शकते. जैविक उत्पाद देखील बीज प्रक्रियेसाठी वापरले जाऊ शकतात. यात चिटोमियम आणि ट्रायकोडर्मा प्रजातीच्या बुरशी आणि सुडोमोनास जीवाणूचा समावेश आहे. या द्रावणांवर आधारित फवारण्या देखील रोगाचा प्रसार कमी करण्यास प्रभावी आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या रोग जंतुना मारण्यासाठी ५०-५४ अंश सेल्शियस तापमानाच्या गरम पाण्यात बुरशीनाशक (उदा. थायरम) मिसळून २ तासांसाठी बीज प्रक्रिया करा. शेतात रसायनिक उपचार प्रभावी नाहीत आणि याची शिफारसही केली जाऊ नये.

कशामुळे झाले

लक्षणे ग्लोमेरेला ट्यूक्यूमेनॅन्सिस बुरशीमुळे उद्भवतात, जी जमिनीत फक्त थोड्या कालावधीसाठीच (महिने) जगु शकते. जरी हा जमीनजन्य रोग जंतु नसला तरी झाडांच्या अवषेशातील पाण्याद्वारे जमिनीत वाहून गेलेले बीजाणू नुकतीच लागवड केलेल्या बियाणे किंवा रोपांमध्ये संक्रमित होतात. त्यानंतर, हा रोग संक्रमित झाडाच्या मध्य शीर किंवा खोडांमध्ये तयार केलेल्या बीजाणूद्वारे पसरतो आणि वारा, पाऊस, भारी दव आणि सिंचन पाण्याद्वारे वाहून नेला जातो. थंड, ओले हवामान, जमिनीतील उच्च आर्द्रता आणि लागोपाठ एकच पीक घेणे हे या रोगाच्या विकासाला अनुकूल असते. दुष्काळ देखील वनस्पतीची संवेदनशीलता वाढवते. ऊसाव्यतिरिक्त ही बुरशी मका आणि ज्वारीसारख्या दुय्यम यजमानांना देखील संक्रमित करू शकते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या क्षेत्रासाठी अनुकूल असलेल्या प्रतिकारक वाणांची निवड करा.
  • प्रमाणित स्त्रोताकडील किंवा निरोगी शेतातील, निरोगी बियाणे आणि रोपे वापरा.
  • हंगामात खूप गरम किंवा अत्यंत थंड तापमान टाळण्यासाठी पेरणीची वेळ बदला.
  • शेताचे नियमित निरीक्षण करा व संक्रमित झाडे किंवा बुंधे उपटून टाका.
  • संक्रमित पिकाची फरतड घेणे टाळा.
  • पिकांचे अवशेष काढुन जाळून टाका.
  • किंवा जमिनीतील बुरशी उन्हात उघडी पाडण्यासाठी बरेचदा नांगरणी करा.
  • संवेदनशील नसणाऱ्या पिकांसोबत २-३ वर्षांसाठी पीक फेरपालट योजना राबवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा