कांदा

लसुणावरील वरील तांबेरा

Puccinia porri

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या दोन्ही बाजूंनी बारीक पांढरे ठिपके येतात.
  • ठिपके कालांतराने मोठे होऊन गडद तपकिरी रंगाच्या फोडात रूपांतरीत होतात.
  • पानांच्या पृष्ठभागावर चीर दिल्यासारखे (भोसकल्या सारखे) व्रण दिसतात.
  • जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडे पिवळी पडून मरगळून सुकतात.
  • लसणीचे कंद आक्रसलेले व कमी प्रतिचे येतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
लसुण
कांदा

कांदा

लक्षणे

वाढीच्या कोणत्याही काळात संसर्ग होऊ शकतो आणि प्रथमतः लक्षणे पानांवर दिसतात. सुरवातीला पानांच्या दोन्ही बाजूंनी बारीक पांढरे ठिपके येतात. ठिपके कालांतराने मोठे होऊन गडद तपकिरी रंगाच्या फोडात रूपांतरित होतात जे बीजाणू तयार करण्याच्या रचनेशी निगडित आहेत. जसजसे फोड मोठे होतात, ते फुटतात आणि बीजाणू सोडले जातात. पाने अखेरीस पिवळी पडतात आणि पानांच्या पृष्ठभागावर चीर दिल्यासारखे (भोसकल्या सारखे) व्रण दिसतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड पिवळे पडून मरगळते ज्यामुळे अकाली सुकते. रोगाचा प्रादुर्भाव वाढीच्या काळात झाल्यास कांदे आकाराने लहान, आक्रसलेले आणि कमी प्रतिचे भरतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

तांबेर्‍यारला प्रतिबंध करणे हाच दूरदर्शीपणाचा मार्ग आहे. सल्फर असणारी काही द्रव्ये सेंद्रिय मानली जातात आणि संसर्ग कमी करण्यासाठी निवारक पद्धतीने वापरता येते. वापराचे विविध प्रकार आहेत, उदा. सल्फरच्या पावडरचा शिडकावा केला जाऊ शकतो फवारणी किंवा आळवणीच्या माध्यमातून दिले जाऊ शकते. योग्य वापरासाठी उत्पादाची संबंधी हस्त पुस्तिका चाळा किंवा आपल्या भागातील विक्रेत्याशी संपर्क करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अॅझॉक्सीट्रोबिन किंवा मँकोझेब असणारे उत्पाद फवारणीद्वारे किंवा जमिनीतील प्रतिबंधक उपचार म्हणुन संसर्गाच्या जोखिमेतुन वाचण्यासाठी केले जाऊ शकतात. कृपया हे बुरशीजन्य रोग बरे करणे शक्य नाही हे लक्षात असू द्या.

कशामुळे झाले

प्युसिनिया पोरी नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो, जिचे जंतु रोपाच्या जिवंत पेशींत जगतात. ते एकतर पर्यायी याजमानांमध्ये (तण किंवा सहज उगवलेल्या रोपात) आपली सुप्तावस्था घालवतात किंवा अक्रिय काळ घालविण्यासाठी बीजाणू तयार करत असतात. बुरशीची बीजाणू वार्‍याने आणि पावसाच्या उडणार्‍या थेंबाने इतर रोपांवर किंवा शेतात वाहुन नेली जातात. उच्च आद्रता, कमी पाऊस आणि १०-२० डिग्री सेल्शियसचे तापमान हे बुरशीच्या पसरण्याला आणि जीवनचक्राला अतिशय अनुकूल आहे. ह्या परिस्थितीत, जेव्हा बीजाणू यजमान रोपांवर पडतात, बुरशीची वाढ आणि वसाहतींची सुरुवात होते. रोगाची लागण होऊन साथ येण्यासाठी १०-१५ दिवस जातात, पण हे तापमान आणि आद्रतेच्या पातळीवर देखील अवलंबुन असते. ह्यांच्या पसरण्याची मुख्य वेळ उन्हाळ्यातील शेवटचा काळ आहे. ह्या रोगामुळे उत्पादनात मोठी घट होते व कंदाची साठवण क्षमता सुद्धा कमी होते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रमाणित स्रोतांकडील निरोगी रोपे किंवा बियाणे वापरा.
  • लागवडीचे अंतर शिफारशीप्रमाणे ठेवा जेणेकरून हवा चांगली खेळती राहील आणि रोगाचा प्रसार नियंत्रित राहील.
  • व्यवस्थित पाण्याचा निचरा होणाऱ्या ठिकाणी लागवड करा, शेतातुन पाण्याचा निचरा चांगला होऊ द्या आणि जास्त पाणी देणे टाळा.
  • खुरपणी करतेवेळेस कंदांना इजा होऊ नये ह्याची काळजी घ्या.
  • नत्राचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत अॅलियम कुटुंबातील पिकांची लागवड करु नका.
  • पोटॅशियमने भरपूर असलेल्या खतांचा (उदा.
  • सल्फेट ऑफ पोटॅश) वापर करा.
  • रात्रीच्या वेळी जमिनीची आद्रता कमी ठेवण्यासाठी सकाळी पाणी देण्याची शिफारस करण्यात येत आहे.
  • ह्या रोगाच्या लक्षणांसाठी शेतात नियमितपणे निरीक्षण करत चला.
  • प्राथमिक लक्षणे दिसताक्षणीच संक्रमित रोपे काढून जाळुन नष्ट करा.
  • २-३ वर्षांपर्यंत यजमान नसलेल्या पिकांबरोबर पीक फेरपालटची योजना करा.
  • लागवडीचे क्षेत्र बुरशीमुक्त ठेवण्यासाठी आजुबाजुला असलेले अॅलियम कुटुंबातील तण काढुन नष्ट करा.
  • शेतीउपयोगी अवजारे इतर ठिकाणी वापरण्यापुर्वी निर्जंतुक करा आणि आपले हातही वारंवार स्वच्छ करा ज्याने रोग एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पसरणार नाही.

प्लँटिक्स डाऊनलोड करा