वाटाणा

वाटाण्यावरील तांबेरा

Uromyces pisi

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • तपकिरी बीजांडांचे थर पानांवर आणि खोडावर दिसतात.
  • पाने विकृत आकाराची होतात.
  • रोपाची वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
वाटाणा
तूर

वाटाणा

लक्षणे

तपिकिरी बिजांडांचे थर पानांच्या दोन्ही बाजुला तसेच खोडावरही दिसतात. कोरड्या हवेत, हे थर पसरलेले असतात. पाने आकाराने विकृत होतात आणि पूर्ण रोपाची वाढ खुंटते. तरीपण पीकावर फारसा परिणाम होत नाही.

Recommendations

जैविक नियंत्रण

रोगाच्या प्रगत अवस्थेतच नुकसान जाणवते. बहुतेक वेळा उपचारांची गरज भासत नाही, कारण पिकाचे जास्त नुकसान होत नाही.

रासायनिक नियंत्रण

टेब्युकोनाझोलवर आधारीत बुरशिनाशक वापरले जाऊ शकते.

कशामुळे झाले

बुरशी घेवड्याच्या (ज्याला बेलबीन्, ब्रॉड बिन्स किंवा इंग्लिश बिन्स असेही म्हटले जाते.), वेलीतुन आणि विविध प्रकारच्या शोभेच्या झाडांवर शेतात विश्रांती घेते. इथुन ती वाटाण्याच्या वेलींवर वसंतात पसरते. हिवाळ्यात बुरशी नविन यजमानाकडे जाते.


प्रतिबंधक उपाय

  • आजुबाजुच्या परिसरातुन पर्यायी यजमान जसे घेवडा (ब्रॉड बीन) म्हणजेच विशिया प्रजाती किंवा लॅथिरस (वेच्टलिंग) काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा