पीच

पीचवरील घुबडा

Taphrina deformans

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • विकृत पाने आणि लालसर रंगहीनता येते.
  • बुरशीची वाढ पानांवर दिसते.
  • अकाली पानगळ होते.

मध्ये देखील मिळू शकते

3 पिके
बदाम
जर्दाळू
पीच

पीच

लक्षणे

पाने उमलल्यानंतर बहुधा लक्षणे लवकरच उमटतात. झाडाच्या वाणाप्रमाणे पाने जाड होतात आणि अत्यंत बेढब असुन सुरकुतलेली, चुरगळलेली किंवा गोळा झालेली असतात आणि लालसर ते जांभळी रंगहीनता असते. जस-जसे संक्रमण प्रगत होते, तस-तसे बुरशीचे विकसन उमलुन पानांच्या पृष्ठभागावर पसरते ज्याने प्रभावित पाने पांढरट राखाडी, पावडरीसारखी दिसु लागतात. राखाडी आच्छादन हळ-हळु काळे होते, ही प्रक्रिया, दिवसाच्या जास्त तापमानाशी मेळ खाते. अखेरीस प्रभावित पाने वाळतात आणि गळतात ज्याने पानगळ होते आणि झाडाचा जोम कमी होतो. लवकरच त्याच फुटव्यात नविन पाने येतात. जेव्हा संक्रमण आंतरप्रवाही होते तेव्हा सालीचा काही भाग किंवा पूर्ण कोंबच काळा पडतो म्हणजेच बुरशी झाडाच्या आतील पेशीतही पसरलेली असते. अशा बाबतीत, फुटव्यातुन अनैसर्गिक आडवे कोंब फुटतात आणि हे विकसन झाडूसारखे दिसते. गंभीर संसर्ग झालेल्या झाडांवरील फळांच्या पृष्ठभागाच्या दिसण्यात फारच वेगळा बदल झालेला जाणवतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या बुरशीचा सामना करण्यासाठी बोर्डो मिश्रणासारखी सेंद्रीय कॉपर संयुगे असणार्‍या बुरशीनाशकांची फवारणी करावी. शरद ऋतुतील पानगळीच्या वेळी एकदा वापरावे आणि पुन्हा एकदा कळ्याधारणेच्या वेळी वसंत ऋतुत वापरावे. लक्षात ठेवा कि कॉपर उत्पादनांच्या सातत्याने केलेल्या वापराने जमिनीत कॉपरचा साठा जमतो, जो अखेरीस जमिनीतील जीवजंतुंसाठी विषारी बनतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॉपर ऑक्झीक्लोराइड, क्युप्रिक हायड्रॉक्साइड, थायरम, झायरम, क्लोरोथॅलोनिल किंवा डायफेनोकोनाझोल असणार्‍या बुरशीनाशकांचा वापर करावा. शरद ऋतुतील पानगळीच्या वेळी एकदा वापरावे आणि पुन्हा एकदा कळ्याधारणेच्या वेळी वसंत ऋतुत वापरावे.

कशामुळे झाले

टाफ्रिना डिफॉर्मान्स नावाच्या बुरशीने झाडांच्या पेशीत वस्ती केल्याने लक्षणे उद्भवतात. पानांच्या पृष्ठभागावर बीजाणूंचे उत्पादन केले जाते आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने किंवा वार्‍याच्या झोताने ते उडुन पीचच्या फांद्या आणि कळ्यांवर पडतात, ज्यामुळे नविन संक्रमणाची सुरवात होते. वारंवार पावसाच्या काळात बीजाणू ऊगवतात, कळ्या वसंत ऋतुत उमलतात आणि अजुन न उमललेल्या पानांना संक्रमित करतात. ज्या क्षणी बीजाणू न उमललेल्या पानांत शिरतात, त्यानंतर संक्रमण प्रक्रिया थांबविण्याचे काहीही प्रभावी उपाय नाहीत. जर ह्या वेळेदरम्यान पाऊस झाला नाही, तर बीजाणू निष्क्रिय रहातात आणि किंचित संक्रमण होते किंवा होतही नाही. पुढील पावसाळ्यापर्यंत हे बीजाणू कळ्यांच्या कोषात किंवा सालीतील खाचेत पूर्ण उन्हाळा आणि हिवाळा काढतात आणि मग पावसाळ्यात ऊगवतात. जेव्हा तापमान १६ अंशापर्यंत असते तेव्हाच बुरशी सक्रिय असते आणि कमी तापमानातच प्रजोत्पादन करु शकते. टाफ्रिना डिफॉर्मन्स फक्त पिच आणि नेक्टरीन तसेच बदाम आणि क्वचितच अॅप्रिकॉट तसेच शोभेच्या प्रुन्सनाच संक्रमित करते.


प्रतिबंधक उपाय

  • कळा उमलण्याच्या काळात पावसापासुन आणि तुषार सिंचनापासुन झाडांना संरक्षण द्या.
  • झाडीत हवा चांगली खेळण्यासाठी दर वर्षी झाडीची छाटणी करा.
  • खतांचा वापर मध्यम प्रमाणात करा.
  • कळ्या उमलण्यापूर्वी पोषक वापरा.
  • व्हाईट फ्लेश वाणांसारखी प्रतिकारक वाणे लावा.
  • पूर्वी संक्रमीत झालेली पाने, आकसलेली फळे आणि कोंब काढुन नष्ट करा.
  • संक्रमणाचा प्रतिबंध करण्यासाठी केव्हाही शक्य असल्यास, पावसापासुन संरक्षण देण्यासाठी प्लास्टिकचा आसरा तयार करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा