कारले

भूरी रोग

Erysiphaceae

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पान, फांद्या आणि फळांवर पांढरट ठिपके येतात.
  • पानांच्या वरच्या किंवा खालच्या बाजुस पांढरे आवरण दिसते.
  • वाढ खुंटते.
  • पाने आक्रसुन गळतात.

मध्ये देखील मिळू शकते

34 पिके
सफरचंद
जर्दाळू
द्वीदल धान्य
कारले
अधिक

कारले

लक्षणे

सुरुवातीला पानांवर, फांद्यांवर आणि काहीवेळा फळांवर गोलाकार पावडरीसारखे पांढरे ठिपके येतात. हे बहुधा पानांच्या वरच्या बाजुस आच्छादुन टाकतात पण पानांच्या खालच्या बाजुसही वाढु शकतात. ह्या बुरशीमुळे प्रकाशसंस्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होते आणि परिणामी पाने पिवळी पडुन वाळतात तसेच काही वेळा पाने मुडपतात, तुटतात किंवा विकृत होतात. नंतरच्या टप्प्यांवर कळ्या आणि वाढणारे कोंब बेढब होतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

बागांमध्ये दूध-पाण्याचे द्रावण नैसर्गिक बुरशीनाशक म्हणून काम करते असे आढळून आले आहे. हा द्राव पानांवर दर दुसर्‍या दिवशी वापरा. हा घरगुती उपाय खासकरुन वेलवर्गीय पिकांवर (काकडी, झुकिनी, डांगर) आणि बेरीजवर चांगले परिणाम देतो. भूरीचे प्रकार यजमानांप्रमाणे विविध आहेत आणि हा उपाय सगळ्या प्रकारांवर परिणामकारक नसुही शकेल. जर कोणतीही सुधारणा दिसली नाही तर लसुण किंवा खायच्या सोड्याचा (सोडियम बायकार्बोनेट) द्राव वापरुन पहा. बाजारात बरेच जैविक उपचार साहित्यही उपलब्ध आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. भूरीसाठी संवेदनशील असलेल्या पिकांची संख्या लक्षात घेता, कोणत्याही विशिष्ट रासायनिक उपचारांची शिफारस करणे कठीण आहे. विरघळणारे गंधक(३ग्रॅ/ली), कार्बेन्डाझिम, ट्रायफ्लुमिझोल, मायक्लोबुटॅनिल (सगळे २ मि.ली./ली) आधारीत बुरशीनाशके, काही पिकांमध्ये ह्या बुरशीच्या वाढीवर नियंत्रण ठेवताना आढळून आले आहेत.

कशामुळे झाले

बुरशीचे बीजाणू न उमललेल्या पानांत आणि झाडांच्या अवशेषात सुप्तावस्थेत रहातात. वारा, पाणी आणि किडे बीजाणूना जवळपासच्या झाडांवर वाहुन नेतात. जरी हा बुरशीचाच प्रकार असला तरीदेखील कोरड्या परिस्थितीत सुद्धा साधारणपणे चांगला वाढतो. १०-१२ डिग्री सेल्शियस तापामानात देखील ही बुरशी जगु शकते, पण ३० डिग्री सेल्शियचे तापमान त्यांच्या साठी सर्वात जास्त अनुकूल असते. केवडा रोगाच्या उलट भूरी ही थोड्या पावसात आणि नियमितपणे पडणार्‍या सकाळच्या दवात जास्त चांगली वाढते.


प्रतिबंधक उपाय

  • ह्या रोगास प्रतिकारक किंवा सहनशील वाणांची निवड करा.
  • लागवडीचे अंतर जास्त ठेवा जेणेकरून शेतात हवा चांगली खेळती राहील.
  • रोगाच्या किंवा उपद्रवाच्या घटनेचे मूल्यांकन करण्यासाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • जेव्हा डाग पहिल्यांदा दिसु लागतात तेव्हाच पाने खुडुन टाका.
  • संसर्गित झाडाला स्पर्श केल्यानंतर निरोगी झाडांपासून दूर रहा.
  • जमिनीवरील बीजाणू पानांवर पसरु नयेत म्हणुन जमिनीवर पालापाचोळ्याचा जाड थर द्या.
  • काही वेळा संवेदनशील नसणार्‍या पिकांसह पीक फेरपालट देखील चांगला परिणाम देऊ शकते.
  • संतुलित पोषकांची खते द्या.
  • तापमानातील खूप जास्त बदल टाळा.
  • पिकाची काढणी झाल्यानंतर झाडांचे उरलेले अवशेष नांगरुन वेचून काढा.
  • काढणीनंतर रोपांचे अवशेष काढा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा