टोमॅटोवरील जिवाणूजन्य ठिपके

 • लक्षणे

 • सुरु करणारा

 • जैव नियंत्रण

 • रासायनिक नियंत्रण

 • प्रतिबंधक उपाय

टोमॅटोवरील जिवाणूजन्य ठिपके

Pseudomonas syringae pv. tomato

जंतु


थोडक्यात

 • पान, खोड आणि फुलांच्या देठांवर पिवळ्या प्रभावळी असलेले गडद तपकिरी ते काळे ठिपके येतात.
 • हे ठिपके एकमेकांवर येऊन पानांवर ओबड धोबड धब्बे तयार होतात.
 • बारीक, उथळ, उंचावलेले काळे ठिपके फळांवर दिसतात.

यजमान

टोमॅटो

लक्षणे

हा जंतुजन्य रोग झाडाच्या विकासाच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ शकतो. लक्षणे मुख्यत: पानांवर आणि फळांवर दिसतात आणि वैशिष्ट्यपूर्ण बारीक, गोल, काळे ठिपके अरुंद पिवळ्या प्रभावळीसकट दिसतात. ठिपके बहुधा विखुरलेले असतात आणि बारीक असतात पण गंभीर संक्रमणात ते एकमेकांत मिसळुन किंवा एकमेकांवर येऊन मोठे ओबड धोबड धब्बे तयार होतात. पानांच्या शीरांपाशी किंवा टोकांपाशी ते जास्त दिसतात ज्यामुळे पाने मुडपू शकतात. फळांवर बारीक, थोडेसे उंचावलेले, काळे ठिपके दिसतात पण ते फक्त वरवरच्या भागांवर संक्रमण करतात. जेव्हा लहान फळे संक्रमित होतात, तेव्हा ठिपके खोलगट असु शकतात. गंभीर बाबतीत, संक्रमित रोपे वाढ खुंटलेली असतात आणि फळे उशीरा पक्व होतात.

सुरु करणारा

स्युडोमोनाज सिरिंगे पीव्ही टोमॅटो नावाच्या जिवाणूमुळे ही लक्षणे उद्भवतात जे जमिनीत, संक्रमित झाडांच्या अवशेषात आणि बियाणांत जगु शकतात. संक्रमित बियाणे वापरल्यास ते संक्रमणाचे पहिला स्त्रोत होतात, कारण वाढणार्‍या झाडात हे जिवाणूही वाढतात आणि त्यांची वसाहत निर्माण करतात. टोमॅटोची पाने आणि फळे दोन्हीवर हे परिणाम करु शकतात. पानांवर आणि फळांवर वाढणारे जीवाणू जे नंतर इतर झाडांवर पावसाच्या उडणार्‍या ठिपक्यांनी आणि थंड दमट परिस्थितीत संक्रमणाचा दुय्यम स्त्रोत बनतात. रोगाचे उद्रेक क्वचितच आढळतो पण फार काळ ओलावा, थंड हवामान त्यांना अनुकूल असते आणि चुकीच्या शेती सवयींमुळे जीवाणू यजमान रोपातुन पसरु शकतात.

जैव नियंत्रण

बीजप्रक्रियेत २०% ब्लीच द्रावणात ३० मिनीटांसाठी बियाणे भिजविण्याने जीवाणू कमी होतात. जिवाणू रुजण्याच्या दरावर परिणाम करत असल्याने बियाणांना ५२ डिग्री सेल्शियस तापमानाच्या पाण्याचे २० मिनीटांसाठी उपचारही केले जाऊ शकते. जेव्हा बीजोत्पादनासाठी पीक घेत असाल तेव्हा बियाणांना टोमॅटोच्या रसात एक अठवड्यासाठी आंबु द्या ज्यामुळे जंतु मारले जातील.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॉपर (तांबा) असणार्‍या जिवाणूनाशकाचा वापर प्रतिबंधक किंवा नियंत्रक उपचारासाठी, रोगाचे पहिले लक्षण दिसताक्षणी रोगाचे आंशिक नियंत्रण करण्यासाठी केला जाऊ शकतो. थंड, पावसाळी आणि ओलसर वातावरणात दर दुसर्‍या अठवड्यात उपचार करा. कॉपरचा प्रतिकार निर्माण होत असल्याने मँकोझेबच्या बरोबरचे मिश्रण असलेल्या जिवाणूनाशकाचीही शिफारस करण्यात येते.

प्रतिबंधक उपाय

 • फक्त प्रमाणित स्त्रोतांकडील निरोगी बियाणेच वापरा.
 • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाणांची निवड करा.
 • शेतापासुन लांब अंतरावर रोपवाटिका तयार करा.
 • काढणीनंतर शेतातुन तण आणि जंगली टोमॅटोची रोपे काढुन टाका.
 • जेव्हा झाडे ओली असतात तेव्हा शेतात काम करणे टाळा.
 • लागवड करते वेळेस रोपांना कसल्याही प्रकारची इजा होऊ नये ह्याची काळजी घ्या.
 • लागवडीचे अंतर व्यवस्थित ठेवा आणि तार काठी करून झाडे उभी राहतील अशी व्यवस्था करा.
 • तुषार सिंचन वापरु नका आणि झाडांना खालुन पाणी द्या.
 • दर दुसर्‍या वर्षाला पीक फेरपालट करा.