टोमॅटोवर जिवाणुजन्य डाग

 • लक्षणे

 • सुरु करणारा

 • जैव नियंत्रण

 • रासायनिक नियंत्रण

 • प्रतिबंधक उपाय

टोमॅटोवर जिवाणुजन्य डाग

Xanthomonas spp.

जंतु


थोडक्यात

 • छोटे, पिवळे हिरवे डाग कोवळ्या पानांवर उमटतात.
 • पाने विकृत आणि मुडपलेली असतात.
 • पिवळ्या प्रभावळीसकट, गडद, पाणी शोषल्यासारखे डाग जुन्या पानांवर आणि फळांवर दिसतात.

यजमान

टोमॅटो

लक्षणे

हे जंतु टोमॅटोची झाडी, फांद्या आणि फळांवर हल्ला करतात. पहिली लक्षणे, छोटे, पिवळे हिरवे डाग कोवळ्या पानांवर दिसतात आणि ती पाने विकृत आणि मुडपलेली असतात. जुन्या पानांत डाग शिरांपर्यंतच जातात, ज्यामुळे कालांतराना कोणेदार दिसतात. पहिल्यांदा हे डाग गडद हिरवे तलकट दिसतात आणि बहुतेक वेळा त्याला पिवळी प्रभावळ असते. जास्त करुन ते पानांच्या कडांवर किंवा टोकावर मोठ्या संख्येने असतात. जर परिस्थिती अनुकूल असली तर ते झपाट्याने वाढुन सुमारे ०.२५ ते ०.५ सें.मी. मोठे होतात आणि गव्हाळ तर तपकिरी लाल रंगाचे होतात. अखेरीस डागांचे केंद्र सुकते आणि गळते ज्यामुळे बंदुकीने गोळी मारल्यासारखा परिणाम दिसतो. फळांवर (०.५ सें.मी.पर्यंत) डागांची सुरवात पिवळ्या प्रभावळीच्या फिकट हिरव्या पाणी शोषलेल्या भागांपासुन होते आणि अखेरीत ते खडबडीत, तपकिरी होतात आणि खपलीसारखे दिसतात.

सुरु करणारा

झँथोमोनाज जातीच्या पुष्कळ प्रजातींच्या जंतुंमुळे हे डाग उद्भवतात. हे जगभरात सापडतात आणि ऊबदार, आर्द्र हवामानात वाढविल्या जाणार्‍या टोमॅटोंसाठी हे फारच विनाशकारी असतात. जंतु बियांत किंवा बियांवर, रोपांच्या अवशेषात आणि काही ठराविक तणांत रहातात. जमिनीतील त्यांच्या जगण्याचा काळ फारच थोडा म्हणजे काही दिवसांपासुन ते अठवड्यांपर्यंतच आहे. जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा ह्यांचा प्रसार पावसाने किंवा फवारा सिंचनाने निरोगी रोपांवर होतो. पानाच्या नैसर्गिक छिद्रातुन आणि जखमांतुन ते रोपात शिरतात. २५ ते ३० डिग्री सेल्शियसचे तापमान ह्यांना फार अनुकूल असते. एकदा का पीक संक्रमित झाले तर मग रोगाचे नियंत्रण करणे फार कठिण आहे आणि पूर्ण पीकच बरबाद होऊ शकते.

जैव नियंत्रण

जंतुंच्या ठिपक्यांचा उपचार फार कठिण आणि महागडा आहे.जर मोसमात रोगाची लागण लवकर झाली तर पूर्ण पीकच नष्ट करण्याचा विचार करा. कॉपर असणारे जंतुनाशक झाडीला आणि फळांना सुरक्षा कवच देतात. विषाणूंचे जंतु (बॅक्टेरियोफेजेस) जे फक्त जंतुंना मारतात ते उपलब्ध आहेत. बियाणांना एक मिनीटभर १.३% सोडियम हापोक्लोराइटमध्ये किंवा गरम पाण्यात (५० डिग्री सेल्शियस) २५ मिनीटांसाठी बुडवुन ठेवल्यास ह्या रोगाच्या घटना कमी होतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॉपर असणारे जंतुनाशक सुरक्षा म्हणुन वापरले जाऊ शकते आणि रोगावर थोडे नियंत्रण मिळविता येते. रोगाचे पहिले लक्षण दिसताच आणि नंतर दर १०-१४ दिवसांनी जेव्हा ऊबदार, आर्द्र हवामान असेल तेव्हा वापर करा. कॉपरचा प्रतिकार निर्माण होण्याच्या घटनाही वारंवार घडतात, म्हणुन कॉपरवर आधारीत जंतुनाशकांबरोबर मँकोझेबचाही उपयोग करावा अशी शिफारस केली जाते.

प्रतिबंधक उपाय

 • प्रमाणित रोगमुक्त बियाणे लावा.
 • प्रतिकारक वाण लावा.
 • ज्या रोपाच्या पानांवर डाग दिसतात ते तपासुन, काढुन जाळुन टाका.
 • शेतातुन आणि आजुबाजुने तण काढुन टाका.
 • जमिनीवरुन रोपे दूषित होऊ नयेत म्हणुन जमिनीवर पालापाचोळा अंथरा.
 • फवारे सिंचन टाळा.
 • हत्यारे आणि उपकरणे स्वच्छ ठेवा.
 • झाडी ओली असताना शेतात काम करु नका.
 • काढणीनंतर नांगरुन रोपाचे अवशेष गाडुन किंवा काढुन टाका.
 • काढणीनंतर जमिनीला उन्हे द्या.
 • दर २-३ वर्षांनी पीक फेरपालट करा.